Join us  

मेट्रोसाठी ६२ हजार ९४३ कोटी, १५७ किलोमीटरचे मेट्रोचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 4:21 AM

मुंबई शहर आणि उपनगरासह मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूककोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने कामाचा वेग वाढवला असून, यासाठी तब्बल ६२ हजार ९४३ कोटींची गुंतवणूक करण्यात येत आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरासह मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूककोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने कामाचा वेग वाढवला असून, यासाठी तब्बल ६२ हजार ९४३ कोटींची गुंतवणूक करण्यात येत आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन मेट्रो प्रकल्पांच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो-७ मार्गिका यापैकी एक आहे. या मार्गाची लांबी १८.५ किलोमीटर आहे. या मार्गावर १७ स्थानके आहेत. दुसरी मार्गिका दहिसर पश्चिम ते डी. एन. नगर, मेट्रो-२ अ आहे.या मार्गिकेची लांबी १६.५ किलोमीटर आहे, यावर १६ स्थानके आहेत. या दोन्ही मेट्रो मार्गांची कामे प्रगतिपथावर आहेत. मेट्रो-७ करिता ६ हजार २०८ कोटी, तर मेट्रो-२ अ करिता ६ हजार ४१० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.तीन मेट्रो प्रकल्पांची बांधकामे सुरूआहेत. डी. एन. नगर ते मंडाले मेट्रो-२ ब, वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो-४ आणि स्वामी समर्थनगर (अंधेरी लोखंडवाला)-विक्रोळी (जेव्हीएलआर मार्गे) मेट्रो-६; या मार्गिकांच्या कामास येत्या वर्षात सुरुवात होईल. २३.५ किमी लांबीच्या मेट्रो-२ ब मार्गिकेवर २२ स्थानके असून, प्रकल्पाची किंमत १० हजार ९८६ कोटी आहे.३२ किलोमीटर लांबीच्यामेट्रो-४ मार्गिकेवर ३२ स्थानकेअसून, या प्रकल्पाची किंमत १४हजार ५४९ कोटी आहे. १४.५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो-६ मार्गिकेवर १३ स्थानके असून, या प्रकल्पाची किंमत ५ हजार ५६६ कोटी इतकी आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणखी चार मेट्रो मार्गिकांचे काम हाती घेणार आहे. २४ किलोमीटर लांबीच्या ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ मार्गिकेवर १७ स्थानके असतील. या प्रकल्पाची किंमत ८ हजार ४१७ कोटी आहे. ८ किलोमीटर लांबीच्या वडाळा ते जीपीओ या मेट्रो-८ प्रकल्पाची किंमत २ हजार ४०० कोटी आहे. ९ किलोमीटर लांबीच्या अंधेरी पूर्व ते वांद्रे पूर्व या मेट्रो-९ प्रकल्पाची किंमत ४ हजार ५०० कोटी आहे.११ किमी लोमीटर लांबीच्यादहिसर पूर्व ते मिरा-भार्इंदरमेट्रो-१० या प्रकल्पाची किंमत ३ हजार ९०८ कोटी आहे. या मेट्रो मार्गिकांमुळे २०२१ मध्ये मुंबईआणि महानगर प्रदेशातील १६० हून अधिक मेट्रो स्थानकांमधून, ४० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतील, असा आशावाद प्राधिकरणाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :मेट्रोमुंबई