Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेक जानेवारीअखेरीस हाेणार मुंबईत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ या दोन्ही मेट्रो मार्गांची कामे वेगाने सुरू असून, बंगळुरू येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ या दोन्ही मेट्रो मार्गांची कामे वेगाने सुरू असून, बंगळुरू येथील मेट्रोच्या कारखान्यातून मेट्रोचे रेक जानेवारी महिन्याच्या अखेरीस मुंबईत दाखल होतील. त्यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये मेट्रोची चाचणी हाेईल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सांगितले.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते शुक्रवारी बंगळुरू येथील मेट्रोच्या कारखान्यात मुंबईसाठीच्या ड्रायव्हरलेस तंत्रज्ञानावर मेट्रोचे अनावरण करण्यात आले. मुंबईत दाखल होणाऱ्या या मेट्रोला सहा कोच असतील. २३ जानेवारीच्या आसपास बंगळुरू येथून मेट्रो या मुंबईसाठी रवाना होतील आणि २७ किंवा २८ जानेवारीच्या आसपास चारकोप मेट्रो डेपोमध्ये दाखल होतील. आजघडीला दहा मेट्रो तयार आहेत. नवीन मेट्राे दाखल झाल्यावर फेब्रुवारी-मार्च महिन्यात मेट्रोच्या चाचण्या घेतल्या जातील. त्यानंतर मे महिन्यात या मेट्राे प्रवाशांच्या सेवेत रुजू हाेतील.

* या मार्गावरून धावणार मेट्राे

मेट्रो - २ अ - दहिसर ते डी.एन. नगर

मेट्रो - ७ - दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व

.........................