मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्यांना ओव्हरहेड वायर बिघाडाचा मनस्ताप सोसावा लागत असतानाच आता मेट्रोतही या समस्येने तोंड वर काढल्याचे दिसून येत आहे. बुधवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी मेट्रोच्या अंधेरी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि मेट्रोचा बोऱ्या वाजला. या घटनेमुळे मेट्रोच्या १२ फेऱ्या अंशत: रद्द करण्यात आल्या. सायंकाळी सव्वा पाच वाजता झालेल्या बिघाडातून प्रवाशांची साडे सहा वाजता सुटका झाली. तोपर्यंत मेट्रो केवळ एअरपोर्ट ते घाटकोपरपर्यंत सुरू होती.याआधीच्या घटना१५ जून २0१४ - मरोळ स्थानकात ओव्हरहेड वायरला पक्ष्याची धडक. तांत्रिक समस्या उद्भवल्याने मेट्रो अर्धा तास लेट.२ जुलै २0१४ - तांत्रिक समस्येमुळे मरोळ स्थानकात मेट्रोच्या दोन डब्यांचे दरवाजे उघडलेच नाहीत.३ जुलै २0१४ - मेट्रोच्या एका डब्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती.१ आॅगस्ट २0१४ - एअरपोर्ट स्थानकाजवळ मेट्रोत बिघाड.
मेट्रोलाही ओव्हरहेडेक
By admin | Updated: July 16, 2015 05:34 IST