Join us

‘कार्यालयांची जागा विकून मेट्रोकडून राजकीय पक्ष, रिझर्व्ह बँकेची फसवणूक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 07:36 IST

दादरमधील टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी आ. विकास ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष रमेश शेट्टी, आदी उपस्थित होते.

मुंबई : नरिमन पाॅइंट येथील मंत्रालयासमोरील काँग्रेस पक्ष कार्यालयाची जागा परस्पर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला विकून मेट्रो काॅर्पोरेशनने राजकीय पक्षांसह रिझर्व्ह बँकेचीही फसवणूक केली, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी शनिवारी केला. हा व्यवहार रद्द करून दिलेल्या आश्वासनानुसार काँग्रेसला त्याच ठिकाणी नवीन कार्यालय बांधून द्यावे; अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशाराही त्यांनी दिला.

दादरमधील टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी आ. विकास ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष रमेश शेट्टी, आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या गांधी भवनसह विविध राजकीय पक्षांची कार्यालये होती. मेट्रो ३ च्या कामासाठी अन्य ठिकाणी स्थलांतरित केली. काम पूर्ण झाल्यावर त्याच जागेत एमएमआरडीए व मेट्रो रेल कॉर्पोरेशनने इमारत बांधून कार्यालये देण्याचा २१ ऑक्टोबर २०१५ रोजी शासन आदेश काढला; तर, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तात्पुरत्या हस्तांतरित करण्याचे पत्र २ डिसेंबर २०१६ रोजी दिले होते, असे सावंत यांनी सांगितले. मेट्रो काॅर्पोरेशन व सरकारने  काँग्रेससह राजकीय पक्षांना अंधारात ठेवून, त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता ही जागा परस्पर रिझर्व्ह बँकेला ३,४०० कोटी रुपयांना विकली, असा आरोप केला.

पक्ष    कुटीर   क्षेत्रफळ

                क्रमांक 

काँग्रेस  १७     ३७२०

शिवसेना ०७     २१६०

राष्ट्रवादी काँग्रेस  २०     ८०४४

भारिप-बहुजन महासंघ    ८      ५७५

शेतकरी कामगार पक्ष    ८      १६५०

पीआरपी (कवाडे गट)     ११     २२८

आरपीआय (डेमोक्रॅटिक)    १९     ६००

समाजवादी पार्टी  २०     १३००

एकूण क्षेत्रफळ          १८२७७

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक