Join us

‘मेट्रो-७’साठी सल्लागार नेमणार

By admin | Updated: April 17, 2016 02:05 IST

अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मार्गावर उभारल्या जाणाऱ्या मेट्रो-७ प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सरसावले आहे. १६ स्थानकांचा समावेश असणाऱ्या आणि उन्नत मार्गाच्या

मुंबई : अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मार्गावर उभारल्या जाणाऱ्या मेट्रो-७ प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सरसावले आहे. १६ स्थानकांचा समावेश असणाऱ्या आणि उन्नत मार्गाच्या बांधकाम नियोजनासाठी एमएमआरडीए सल्लागार नेमणार आहे. सुमारे ४ हजार ७३७ कोटी रुपये खर्च असणाऱ्या मेट्रो-७ प्रकल्पासाठी सल्लागार पदाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख २८ एप्रिल आहे. अंधेरी ते दहिसर या १६.६ किमी मार्गावर मेट्रो-७ प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हे काम तीन टप्प्यांत पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात अंधेरी पूर्व, शंकरवाडी, जेव्हीएलआर जंक्शन, महानंद व न्यू अशोकनगर ही स्थानके असतील. दुसऱ्या टप्प्यात आरे, दिंडोशी, पठाणवाडी, पुष्पा पार्क, बाणडोंगरी आणि महिंद्रा या सहा स्थानकांचा समावेश आहे. अंतिम टप्प्यात मागाठणे, देवीपाडा, नॅशनल पार्क, ओवरीपाडा आणि दहिसर पूर्व या स्थानकांचा समावेश असेल. (प्रतिनिधी)