Join us  

मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामांना आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 2:28 AM

मेट्रो-३ च्या पॅकेज १चे सूर्या-१ व पॅकेज-३चे तानसा-१ या टनेल बोअरिंग मशिन्स (टीबीएम) भूगर्भात उतरविण्याच्या प्रक्रियेस गुरुवारी मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशनद्वारे सुरुवात करण्यात आली.

मुंबई - मेट्रो-३ च्या पॅकेज १चे सूर्या-१ व पॅकेज-३चे तानसा-१ या टनेल बोअरिंग मशिन्स (टीबीएम) भूगर्भात उतरविण्याच्या प्रक्रियेस गुरुवारी मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशनद्वारे सुरुवात करण्यात आली. पॅकेज-१चे सूर्या-१ हे टीबीएम कफ परेड येथे बांधण्यात आलेल्या टीबीएम शाफ्टमध्ये तर पॅकेज-३ चे तानसा-१ हे टीबीएम सायन्स म्युझियम येथे बांधण्यात आलेल्या टीबीएम शाफ्ट मधून उतरविण्यात येत आहे. याशिवाय पॅकेज -४ चे तिसरे टीबीएम कृष्णा-३ देखील सिद्धिविनायक मंदिराजवळील टीबीएम शाफ्टद्वारे भूगर्भात उतरविण्यात येत आहे.सूर्या-१ व तानसा-१ या दोन्ही मशिन्स रॉबिन्स या अमेरिकन कंपनीच्या असून त्या शेंयांग चीन येथे तयार झालेली आहेत. सूर्या-१ या टीबीएमचे वजन जवळपास ७०० टन असून त्याद्वारे २९३२ मीटर लांबीचा अपलाइन बोगदा बांधण्यात येणार आहे, तसेच ५०० टन वजन असलेल्या तानसा-१ मार्फ त वरळीपर्यंतचे २०८० मीटरचे भुयारीकरण होणार आहे.पॅकेज-४ चे कृष्णा-३ हे ४०० टनाचे मशीन हेरेन्केट या जर्मन कंपनीचे असून त्याद्वारे वरळीपर्यंत १२९० मीटरचा बोगदा बांधण्यात येणार आहे.याविषयी बोलताना मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशनचे संचालक एस. के. गुप्ता म्हणाले, गुरुवारी आणखी तीन टीबीएम्स भूगर्भात उतरविण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे, ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे.प्रकल्पाच्या एकूण ११ टीबीएम्स भूगर्भात उतरविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ८ टीबीएम्सद्वारे ४२०९ मीटर भुयारीकरण पूर्ण झाले आहे. सूर्या टीबीएम भूगर्भात उतरविण्याच्या निमित्ताने कफ परेड येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपायुक्त कुकनूर, मुख्य अभियंता, सागरी मार्ग प्रकल्प, श्री मोहन माचीवाल, मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशनचे कार्यकारी संचालक (नियोजन) आर रमणा व मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :मेट्रो