Join us  

मेट्रो-२ ब चे काम ‘सिम्प्लेक्स इन्फ्रा’ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 2:23 AM

डी.एन. नगर ते मानखुर्द या १२ किमी लांबीच्या मेट्रो २ - ब मार्गिकेच्या व्हयाडक्ट आणि ११ स्थानकांच्या संकल्पचित्र आणि बांधकामांकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) मागविण्यात आलेल्या निविदा उघडण्यात आल्या.

मुंबई : डी.एन. नगर ते मानखुर्द या १२ किमी लांबीच्या मेट्रो २ - ब मार्गिकेच्या व्हयाडक्ट आणि ११ स्थानकांच्या संकल्पचित्र आणि बांधकामांकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) मागविण्यात आलेल्या निविदा उघडण्यात आल्या. या निविदांमधून मे. सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला १ हजार ८० कोटी इतकी कमी निविदाधारक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. कार्यकारी समितीने मान्यता दिल्यानंतर कामाचे कंत्राट देण्यात येईल, असे प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी सांगितले.सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी एसिकनगर, प्रेमनगर, इंदिरानगर, ओल्ड एअरपोर्ट कार्यालय, खीरानगर, सारस्वतनगर, नॅशनल कॉलेज, वांद्रे (प.) , एमएमआरडीए कार्यालय, इन्कम टॅक्स कार्यालय आणि बीकेसी या ११ स्थानकांचे बांधकाम करणार आहे.

टॅग्स :मेट्रोमुंबई