Join us
Daily Top 2Weekly Top 5

चारकाेप डेपाेत झाली मेट्राेची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:07 IST

मुंबई : मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ चे काम वेगाने सुरू असून, आता या कामाचा एक भाग म्हणून मुंबई महानगर ...

मुंबई : मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ चे काम वेगाने सुरू असून, आता या कामाचा एक भाग म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून गुरुवारी चारकोप आगारात एकत्रित ६ डब्यांच्या ट्रेनची डायनॅमिक कमी गतीमध्ये ५२० मीटर अंतराची चाचणी घेण्यात आली. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रो मे किंवा जून महिन्यात प्रवाशांना घेऊन धावणार असून, या दोन्ही मेट्रोंमुळे अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील १३ लाख प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे.

मेट्रो लाइन २ अ आणि लाइन ७ हे दोन्ही मेट्रो मार्ग महत्त्वपूर्ण आहेत. यामुळे अंधेरी आणि दहिसर दरम्यान मेट्रो प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होणार असून, त्यामुळे उपनगरीय लोकल गाड्यांवरील गर्दीचा ताण कमी होणार आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांवर नियंत्रण ठेवणे आणि एकात्मिक कृतींसाठी चारकोप आगार विकसित केले आहे.

--------------

मेट्रो २ अ - दहिसर पूर्व ते डीएननगर

मेट्रो ७ - अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व