Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यावर हल्ला आरोपीस अटक

By admin | Updated: March 28, 2017 03:45 IST

दादरमधील व्यावसायिक विनोद प्रकाश नाटेकर (४३) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या विक्रम

मुंबई : दादरमधील व्यावसायिक विनोद प्रकाश नाटेकर (४३) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या विक्रम भुतेकरला शिवाजी पार्क पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने अटक केली. त्याने अभिषेक गुप्ताच्या सांगण्यावरून हल्ला केल्याचे तपासात समोर आले. उोघेही अभिलेखावरील आरोपी असून, गुप्ता फरार आहे.दादरच्या आगार बाझार परिसरातील अन्नपूर्णा इमारतीमध्ये सहकुटुंब राहाणाऱ्या नाटेकर यांचा पाणी विक्रीचा व्यवसाय आहे. २१ मार्चला रात्री साडेनऊच्या सुमारास मोबाईलवर बोलत असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजनुसार भुतेकरला अटक केली आहे. (प्रतिनिधी)