Join us  

‘अदानी’च्या वीज दरवाढीस एमईआरसीकडून मज्जाव

By अतुल कुलकर्णी | Published: December 07, 2018 6:52 AM

अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीला पुढील आदेश येईपर्यंत ठरवून दिलेल्या ०.२४ टक्क्याच्या वरती कोणतीही वीज दरवाढ करण्यास मज्जाव करणारा आदेश एमईआरसीने दिला आहे.

- अतुल कुलकर्णी मुंबई : अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीला पुढील आदेश येईपर्यंत ठरवून दिलेल्या ०.२४ टक्क्याच्या वरती कोणतीही वीज दरवाढ करण्यास मज्जाव करणारा आदेश एमईआरसीने दिला आहे. अदानीच्या वतीने आयोगापुढे तीन मुद्दे मांडण्यात आले, त्यातूनच अनेक प्रश्न निर्माण झाल्याने त्यासाठी आता स्वतंत्र चौकशी समितीही नेमली जाणार आहे.अदानीचे मुंबईत २५ लाख ग्राहक आहेत. त्यातील जवळपास १ लाख लोकांच्या बिलात २० टक्क्यांपेक्षा जास्त भाडेवाढ झाल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सगळ्या प्रकाराची सविस्तर चौकशी करावी लागेल, असे आयोगाचे मत झाल्याने आता यासाठी चौकशी समिती नेमली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. गुरुवारी आयोगापुढे अदानी इलेक्ट्रिसिटीच्या वतीने म्हणणे मांडण्यात आले. ज्या काळात रिलायन्सचे अदानीला हस्तांतरण झाले त्याच काळात १२ सप्टेंबर रोजी आयोगाने विजेचे दर कमी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे टाटा आणि बेस्टची बिले आॅक्टोबरमध्ये कमी आली. मात्र एकट्या अदानीची बिले त्याच महिन्यात कशी वाढली? जर रिलायन्सकडून हस्तांतरण करताना त्यांचा बोजा अदानीवर आला म्हणून दरवाढ झाली तर त्यासाठी आयोगाची परवानगी घेतली होती का, असे प्रश्न या वेळी उपस्थित झाले. त्यासाठी आता रिलायन्स आणि अदानी यांचा ताळेबंदही चौकशी समिती तपासेल, असे सांगण्यात आले आहे.ज्या काळात हस्तांतरण झाले त्याच काळात मीटर रीडर संपावर गेले होते, असाही मुद्दा मांडण्यात आला. मात्र ज्यांची बिले पाठवण्यात आली त्यांच्या बिलांचे फोटो बिलांवर होते का? प्रत्यक्ष जागेवर जाऊन रीडिंग घेतले होते का? अशा प्रश्नांचीही चौकशी या वेळी केली जाणार असल्याचे समोर आले आहे. शिवाय दरवाढीमागे मीटर सदोष होते की सिस्टीमचा दोष होता की रीडिंग नीट घेतले गेले नव्हते, असे प्रश्नही आयोगाने चर्चेत विचारल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्याची कोणतीही समाधानकारक उत्तरे अदानीच्या वतीने दिली गेली नाहीत, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.>अदानीच्या वतीने मांडलेले मुद्देआॅक्टोबर हीटमुळे विजेचा वापर जास्तझाला त्यामुळे वीज बिल जास्त आले.रिलायन्सकडून अदानीकडे वीजपुरवठ्याचे हस्तांतरण होत असताना त्यांचा बोजा अदानीवर आला, त्याचा परिणाम बिलावर झाला.विजेचा वापर वाढल्यामुळे वापर करणाºयांच्या गटात बदल झाले, परिणामी विजेचे बिलवाढून आले.

टॅग्स :वीज