Join us  

Mega Block Today : मध्य, हार्बर रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2021 10:05 AM

Mega Block Today : ब्लॉक कालावधीत ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी व नेरूळ स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा उपलब्ध असतील.

ठळक मुद्देहार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत लोकलच्या फेऱ्या बंद राहतील.

मुंबई : रविवार (दि. ६ जून) रेल्वेच्या मध्य व हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे.मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते भायखळादरम्यान धीम्या व जलद मार्गावर रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत एकही लाेकल धावणार नाहीत, तर, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत लोकलच्या फेऱ्या बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांच्या साेयीसाठी ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान विशेष गाड्या चालविल्या जातील. ब्लॉक कालावधीत ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी व नेरूळ स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा उपलब्ध असतील. 

टॅग्स :मुंबईलोकल