Join us  

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 8:12 AM

रेल्वे मार्गिका, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी रविवार, ७ एप्रिल रोजी मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे.

मुंबई : रेल्वे मार्गिका, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी आज मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे.मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी १०.३७ ते दुपारी ३.३१ वाजेपर्यंत धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालविण्यात येतील. या लोकल फेऱ्यांना मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन या स्थानकांवर थांबा असेल. त्यानंतर त्या माटुंगा स्थानकावरून धिम्या मार्गावर चालविण्यात येतील.रविवारी दुपारी ११ वाजून ४ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ६ मिनिटांनी कल्याणहून सुटणाऱ्या जलद लोकल नियमित थांब्यांसह दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवरही थांबतील. सकाळी १० वाजून १६ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ५४ मिनिटांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाºया जलद लोकल नियमित थांब्यांसह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकांवरही थांबतील.हार्बरवरील सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी रविवारी सकाळी १०.३४ ते दुपारी ३.०८पर्यंत लोकल धावणार नाही. सकाळी १०.२१ ते दुपारी तीनपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीला जाणाºया सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागेल.पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉकपश्चिम रेल्वे मार्गावर माहिम ते गोरेगाव यादरम्यान दोन्ही दिशेंकडील मार्गावर जम्बोब्लॉक आहे. रविवारी सकाळी ९.५६ ते दुपारी ४ वाजून ४ मिनिटांपर्यंत सीएसएमटी ते वांद्रे, अंधेरी, गोरेगावसाठी एकही लोकल धावणार नाही. याचप्रमाणे सकाळी १०.४५ ते दुपारी ४.२९ वाजेपर्यंत वांद्रे, अंधेरी, गोरेगाव ते सीएसएमटीच्या दिशेने धावणाºया सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.पेण, रोहादरम्यान ट्रॅफिक ब्लॉक- मध्य रेल्वे मार्गावरील पेण ते रोहादरम्यान पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी ६ एप्रिल ते १० एप्रिलपर्यंत दुपारच्या सुमारास ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे ब्लॉक दरम्यान चालविण्यात आलेल्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.- ६ आणि ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांपासून ते दुपारी ५ वाजून २५ मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे गाडी क्रमांक ६१०११ दिवा ते रोहा मेमू सोमटने आणि रोहादरम्यान रद्द करण्यात येणार आहे. याचप्रमाणे गाडी क्रमांक ६१०१२ रोहा ते दिवा मेमू रोहा ते सोमटने स्थानकांदरम्यान रद्द करण्यात येईल.- ८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजून १० मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून १० मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. या काळात गाडी क्रमांक ६१०१९ दिवा ते पेण मेमू सोमटने आणि पेणदरम्यान, तर गाडी क्रमांक ६१०२० पेण ते दिवा मेमू पेण ते सोमटने या स्थानकांदरम्यान रद्द करण्यात येईल. ब्लॉक काळात पेण ते रोहा दरम्यान येणाºया आणि जाणाºया मेल, एक्स्प्रेस, मालगाडी यांना ७ ते ९० मिनिटांपर्यंत उशीर होऊ शकतो.च्याचप्रमाणे ९ ते १० एप्रिल रोजी दुपारी २ वाजून ३० मिनिटांपासून ते दुपारी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. तर गाडी क्रमांक ६१०१२ रोहा ते दिवा मेमू दुपारी ४.१५ मिनिटांऐवजी दुपारी ४ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल.

टॅग्स :मुंबईमुंबई लोकल