Join us

मध्य, हार्बरवर आज मेगाब्लॉक

By admin | Updated: May 22, 2016 01:35 IST

मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप जलद मार्गावर आणि हार्बरच्या कुर्ला-मानखुर्द मार्गावर दोन्ही दिशांना रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप जलद मार्गावर आणि हार्बरच्या कुर्ला-मानखुर्द मार्गावर दोन्ही दिशांना रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी ११.४५ ते दुपारी ३.४५ दरम्यान हा ब्लॉक असेल. त्यामुळे मुलुंड-माटुंगा अप जलदच्या गाड्या अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड-माटुंगा दरम्यान सर्व स्थानकांत थांबतील. कुर्ला-मानखुर्द मार्गावरील दोन्ही दिशांवर सकाळी ११.१० ते दुपारी ३.१० पर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसटी स्थानकापर्यंत तसेच सीएमटीहून पनवेल दिशेपर्यंतची सर्व स्थानकांसाठी लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल-मानखुर्द मार्गासह कुर्ला-सीएसटी मार्गावर विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. हार्बरच्या प्रवाशांना रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ट्रान्स-हार्बर व मुख्य मार्गावरून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.