Join us  

मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 7:19 PM

विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावरील विशेष सेवा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित थांब्यावर थांबतील.

ठळक मुद्देपायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले.

डोंबिवली : मध्य रेल्वे, मुंबई विभागात उद्या (दि.९) विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी उपनगरी रेल्वे भागांत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

सँडहर्स्ट रोड-विद्याविहार अप व डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील विशेष सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित थांब्यावर थांबतील.

विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावरील विशेष सेवा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित थांब्यावर थांबतील. 

हार्बर लाइन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.२५ ते दुपारी ४.२५ पर्यंत चुनाभट्टी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.१५ ते दुपारी ४.०० दरम्यान पनवेलला जाणा-या डाऊन  हार्बर मार्गावरील विशेष सेवा बंद राहतील.

पनवेल येथून सकाळी ९.०५ ते दुपारी २.१५  या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणा-या अप हार्बर मार्गावरील विशेष सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत विशेष उपनगरी रेल्वेगाड्या पनवेल - कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक .8) - पनवेल या विभागात चालविण्यात येतील.

दरम्यान, ब्लॉकच्या कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत मुख्य मार्गावरुन प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. 

टॅग्स :मुंबई लोकल