Join us

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विविध दुरुस्ती कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल.मध्य रेल्वे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विविध दुरुस्ती कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल.

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा - मुलुंड अप व डाउन जलद मार्गांवर सकाळी ११.३० ते संध्याकाळी ४.३० दरम्यान मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी १०.५४ ते सायंकाळी ४.०५ या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील उपनगरी गाड्या माटुंगा येथे डाउन धिम्या मार्गावर वळविल्या जातील आणि शीव ते मुलुंड या सर्व स्थानकांवर थांबून मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.

ठाणे येथून सकाळी ११.२२ ते सायंकाळी ४.१७ दरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथून अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. मुलुंड ते दादरदरम्यान सर्व स्थानकांवर थांबून परळ येथे अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

हार्बर रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी / वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते संध्याकाळी ४.४० आणि चुनाभट्टी / वांद्रे - सीएसएमटी अप हार्बर मार्गांवर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल. सीएसएमटी / वडाळा रोड येथून सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी / बेलापूर / पनवेलसाठी सुटणाऱ्या व सीएसएमटीहून सकाळी ९.५६ ते संध्याकाळी ४.४३ दरम्यान वांद्रे / गोरेगावकरिता सुटणाऱ्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

* पनवेल ते कुर्ला विशेष फेऱ्या

सीएसएमटीहून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० या वेळेत पनवेल / बेलापूर / वाशी येथून सुटणाऱ्या आणि सीएसएमटीहून सकाळी १०.४५ ते संध्याकाळी ४.५८ दरम्यान गोरेगाव/ वांद्रे येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष फेऱ्या चालविण्यात येतील.

.........................