Join us  

Mumbai Train Update : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 6:09 AM

Mumbai Train Status : सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस २० मिनिटे उशिराने पोहोचतील.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मुलुंड ते माटुंगा दरम्यान धिम्या मार्गावर, पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुझ ते माहिम दरम्यान जलद मार्गावर, तर पनवेल ते वाशी दरम्यान हार्बर मार्गावर रविवार, १६ फेब्रुवारी रोजी ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस २० मिनिटे उशिराने पोहोचतील.मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११.३०ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉक काळात मुलुंड ते माटुंगा दरम्यान सीएसएमटी दिशेकडे जाणाºया धिम्या लोकल जलद मार्गावरून धावतील.हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी दोन्ही दिशेकडे सकाळी ११.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही. नेरूळ/बेलापूर-खारकोपर या मार्गासहित या लोकल रद्द करण्यात येतील. याचप्रमाणे पनवेल/बेलापूरहून सीएसएमटी दिशेकडे जाणाºया लोकल सकाळी ११.०६ ते दुपारी ४.०१ पर्यंत तसेच सीएसएमटीहून बेलापूर/पनवेल दिशेकडे जाणाºया लोकल सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ पर्यंत रद्द करण्यात येतील. याचप्रमाणे सकाळी १०.१२ ते दुपारी ३.५३ पर्यंत पनवेलहून ठाणे दिशेकडे एकही लोकल धावणार नाही, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सकाळी ११.१४ ते दुपारी ३.२० पर्यंत ठाण्याहून पनवेल दिशेकडे जाणाºया, सकाळी ११.०२ ते दुपारी ३.३२ नेरूळ/बेलापूरहून खारकोपर दिशेकडे जाणाºया तसेच सकाळी ११.३० ते दुपारी ४.१६ पर्यंत खारकोपरहून नेरूळ/बेलापूर दिशेकडे जाणाºया लोकल रद्द करण्यात येतील. याचप्रमाणे पनवेल ते अंधेरी लोकल सेवादेखील रद्द करण्यात आली आहे.पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते माहिम स्थानकांदरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर ब्लॉक असेल. सांताक्रुझ ते माहिम दरम्यान दोन्ही दिशेकडील लोकल धिम्या मार्गावर चालविण्यात येतील.

टॅग्स :मध्य रेल्वेहार्बर रेल्वेपश्चिम रेल्वेमुंबई ट्रेन अपडेट