Join us  

तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 5:47 AM

रविवारी, मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणेदरम्यान मेगाब्लॉक असेल.

मुंबई : रविवारी, मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणेदरम्यान मेगाब्लॉक असेल. परिणामी, जलद लोकल धिम्या मार्गावर धावतील. तर पश्चिम रेल्वे मार्गावर मरिन लाइन्स ते माहिम या स्थानकांदरम्यान विरार दिशेकडील धिम्या मार्गावर ब्लॉक असेल. परिणामी, महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा रोड येथे लोकलला थांबा नसेल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे यादरम्यान सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावर रविवारी सकाळी १०.५४ पासून ते दुपारी ३.५२ पर्यंत मेगाब्लॉक असेल. यादरम्यान कल्याणहून सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. या लोकल ठाणे स्थानकापर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील. त्यानंतर या लोकल जलद मार्गावर चालविण्यात येतील. तर रविवारी रत्नागिरी-दादर पॅसेंजर एक्स्प्रेची सेवा दिवा स्थानकापर्यंत असेल. त्यानंतर दिवा स्थानकातूनच ही एक्स्प्रेस रत्नागिरीकडे रवाना होईल.पनवेल ते वाशी दोन्ही दिशेकडील हार्बर मार्गावर आणि बेलापूर/सीवूड-खारकोपर मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ४.०१ वाजेपर्यंत रद्द करण्यात येणार आहेत. सकाळी ११.३० ते दुपारी ४ पर्यंत पनवेलहून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सकाळी १०.०३ पासून ते दुपारी ३.१६ वाजेपर्यंत सीएसएमटीहून पनवेल/बेलापूरकडे जाणाºया लोकल रद्द करण्यात येतील. ब्लॉक काळात पनवेल ते अंधेरी स्थानकांदरम्यानची सेवा रद्द असतील. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते वाशी मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येतील.सकाळी १०.१२ वाजल्यापासून ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत पनवेलहून ठाणे दिशेकडे जाणाºया लोकल रद्द करण्यात येतील. सकाळी ११.१४ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाण्याहून पनवेल दिशेकडे जाणाºया लोकल रद्द करण्यात येतील. ब्लॉक काळात ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान लोकल सुरू असतील. सकाळी ११.०२ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत बेलापूरहून खारकोपर येथे जाणाºया लोकल रद्द करण्यात येतील. सकाळी ११.३० ते दुपारी ४.१६ वाजेपर्यंत खारकोपरहून बेलापूर/नेरूळकरिता जाणाºया लोकल रद्द करण्यात येतील.पश्चिम रेल्वे मार्गावर मरिन लाइन्स ते माहिम स्थानकादरम्यान विरार दिशेकडील मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. रविवारी, सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ यादरम्यान मरिन लाइन्स ते माहिम या स्थानकादरम्यान विरार दिशेकडील धिम्या मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉकवेळी विरार दिशेकडील धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर धावतील. महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड या स्थानकांना जलद मार्गावरील फलाट नसल्याने लोकल थांबणार नाहीत.>पश्चिम रेल्वेच्या धिम्या मार्गावर ४० दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक>ब्लॉक काळात केले जाणार लोअर पुलाचे कामलोअर परळ येथील पुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर १४ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर असा ४० दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानुसार मध्यरात्री १.२५ ते पहाटे ५.२५ वाजेपर्यंत विरार दिशेकडील धिम्या मार्गावर ब्लॉक असेल. परिणामी, अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर, पहाटेच्या लोकल महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड या स्थानकांना जलद मार्गावरील फलाट नसल्याने तेथे थांबणार नाहीत. या कामासाठी पहाटे ४.१५ ची चर्चगेट-विरार लोकल, पहाटे ४.१९, ४.३८, ४.४६, ५ चर्चगेट-बोरीवली लोकल मुंबई सेंट्रल ते माहिम स्थानकादरम्यान जलद मार्गावर चालविण्यात येईल. महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा रोड या स्थानकावर थांबा नसेल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.>रद्द केलेल्या लोकलपहाटे ५.०६ वाजता महालक्ष्मीहून भार्इंदर जाणारी लोकलपहाटे ५.२० वाजता महालक्ष्मीहून बोरीवली जाणारी लोकलसकाळी ६.०७ वाजता बोरीवलीहून चर्चगेट जाणारी लोकलसकाळी ६.२७ वाजता बोरीवलीहून चर्चगेट जाणारी लोकल>कुर्ला स्थानकात रात्रकालीन विशेष ब्लॉकविद्याविहार येथे लोकल थांबा नाहीमध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला येथे पादचारी पुलाचे गर्डर काढून नवीन गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक घेण्यात येईल. यासाठी कुर्ला स्थानकात कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर शनिवारी-रविवारी रात्री ११.३० ते पहाटे ४.३० पर्यंत विशेष ब्लॉक असेल. परिणामी, लोकलच्या मार्गात बदल केला असून विद्याविहार येथे लोकल थांबणार नाहीत.ब्लॉकच्या वेळी माटुंगा स्थानकातून रात्री ११.२१ ते १२.४६ पर्यंत कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावरून जाणाºया लोकल जलद मार्गावर धावतील.या लोकल माटुंगा ते घाटकोपरपर्यंत जलद मार्गावर चालविण्यात येतील. विद्याविहार स्थानकाला जलद मार्गावरील फलाट नसल्याने लोकल थांबणार नाही. कल्याण दिशेकडे जाणाºया एक्स्प्रेस २० ते २५ मिनिटांनी उशिराने धावतील.