Join us
Daily Top 2Weekly Top 5

आज मेगाब्लॉक

By admin | Updated: April 30, 2017 04:21 IST

मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणेदरम्यान अप धीमी मार्गावर तर हार्बरवर कुर्ला-वाशी स्थानकादरम्यान अप-डाउन मार्गांवर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणेदरम्यान अप धीमी मार्गावर तर हार्बरवर कुर्ला-वाशी स्थानकादरम्यान अप-डाउन मार्गांवर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.मेगाब्लॉकमुळे कल्याण-ठाणे धीमी मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्या ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा स्थानकात थांबणार नाहीत. या स्थानकातील प्रवाशांनी डाउन मार्गाने ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण स्थानक गाठून अपेक्षित स्थानकाकरता प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे. हार्बरवरील ब्लॉकमुळे सीएसटी ते पनवेल दिशेकडील अप-डाउन मार्गांवरील सेवा बंद असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल मार्गांवर विशेष लोकल चालवल्या जातील. (प्रतिनिधी)