Join us  

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2020 3:39 AM

पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक

मुंबई : अभियांत्रिकी तसेच देखभालीच्या कामांसाठी रविवार, ४ ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक असेल.मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाउन जलद मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.३० दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील विशेष सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील. कल्याण स्थानकावरून सकाळी ११.१० ते दुपारी ३.१९ वाजेपर्यंत अप जलद मार्गांवरील विशेष सेवा कल्याण ते मुलुंडदरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित थांब्यांवर थांबतील.चुनाभट्टी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डाऊन हार्बर मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत तर चुनाभट्टी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून वाशी / पनवेलसाठी सुटणाºया डाऊन हार्बर मार्गावरील विशेष सेवा सकाळी ११.१५ ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत बंद राहतील.तसेच पनवेल / वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील विशेष सेवा सकाळी ८.४५ ते दुपारी १.४५ या वेळेत बंद राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८)दरम्यान विशेष सेवा चालविल्या जाणार आहेत.तसेच दुरुस्ती कामांसाठी पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान जलद अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी १५.३५ या वेळेत जम्बोब्लॉक असेल. ब्लॉक काळात जलद अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावरून धावतील.

टॅग्स :पश्चिम रेल्वेमध्य रेल्वेहार्बर रेल्वे