Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेगाब्लॉकचा परीक्षार्थींना फटका

By admin | Updated: December 29, 2014 02:53 IST

भूमी अभिलेख विभागातील शिपाई पदासाठी रविवारी आयोजित केलेल्या परीक्षार्थींना पश्चिम रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉकचा फटका बसला.

मुंबई : भूमी अभिलेख विभागातील शिपाई पदासाठी रविवारी आयोजित केलेल्या परीक्षार्थींना पश्चिम रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉकचा फटका बसला. वेळेत परीक्षा केंद्रांवर पोहचता न आल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी एसएफआय संघटनेने केली आहे. कोकण पुणे येथून परीक्षेसाठी आलेल्या सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना रेल्वे मेगाब्लॉकचा फटका बसला. ही परीक्षा दुपारी ३ ते ५ या वेळेत घेण्यात येणार होती. विले पार्ल्यातील पार्ले टिळक विद्यालय परीक्षा केंद्र आलेल्या विद्यार्थ्यांना तेथे पोहचण्यास १0 मिनिटे उशिर झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात घेतले नाही. (प्रतिनिधी)