Join us

कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर मेगाब्लॉक

By admin | Updated: August 15, 2015 23:19 IST

मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे अप जलद मार्गासह हार्बरच्या कुर्ला-वाशी मार्गावरील दोन्ही दिशांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे ब्लॉक स. ११.१० ते दु. ३.३० व हार्बरला

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे अप जलद मार्गासह हार्बरच्या कुर्ला-वाशी मार्गावरील दोन्ही दिशांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे ब्लॉक स. ११.१० ते दु. ३.३० व हार्बरला स. ११ ते दु. ३ या वेळेत असतील. मुख्य मार्गावरील कल्याण-ठाणे अप जलदच्या गाड्या त्या कालावधीत अप धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. त्या लोकल सर्व ठिकाणी थांबतील. ठाण्यानंतर पुन्हा जलद मार्गे धावतील. (प्रतिनिधी)आवाहन : लांब पल्ल्यांच्या गाड्याही त्या कालावधीत धीम्या अप मार्गावरून धावतील. दादर-रत्नागिरी ही गाडी मात्र दिवा स्थानकातून सुटणार असल्याचेही म.रे.च्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले. एलटीटीहून सुटणारी नेत्रावती ही स. ११.४० ऐवजी दुपारी ३.५० ला सुटणार असल्याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केले आहे. प्रवासाची मुभा प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांना आहे त्याच तिकीट पासावर ट्रान्स हार्बरमार्गे स. १० ते दु. ४ या वेळेत प्रवासाची मुभा देण्यात आली असल्याचेही जाहीर केले आहे. हार्र्बरच्या कुर्ला-वाशी अप/डाऊन मार्गावर ब्लॉक असल्याने त्या कालावधीत पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसटीसाठी आणि तेथून त्या स्थानकांसाठी सुटणाऱ्या गाड्यांची वाहतूक रद्द करण्यात येणार आहे.