Join us

मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक  

By सचिन लुंगसे | Updated: July 26, 2024 20:52 IST

Mega Block News: मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई - मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर सकाळी ११.०५ ते सायंकाळी  ४.०५ पर्यंत पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ०२.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यापुढे माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील. १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्याच्या पलीकडे असलेल्या जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. सकाळी १०.५० ते दुपारी ३ पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. त्यापुढे मुलुंड आणि माटुंगा दरम्यान थांबतील. पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. १५ मिनिटांनी पोहोचतील.

सकाळी ११.०५ ते सायंकाळी  ४.०५ पर्यंत पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक आहे. पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत  येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द आहेत. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत ठाणे येथे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द आहेत. डाउन जलद मार्ग- ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर आहे. सीएसएमटी येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल.- ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर आहे. सीएसएमटी येथून दुपारी ३.०३ वाजता सुटणार आहे. डाउन हार्बर मार्ग- ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटी येथून सकाळी ९.३० वाजता सुटेल. १०.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल.- ब्लॉकनंतर पहिली लोकल सीएसएमटी येथून दुपारी ३.१६ वाजता सुटेल. पनवेल येथे सायंकाळी ४.३६ वाजता पोहोचेल. अप हार्बर मार्ग- ब्लॉकपूर्वी सीएसएमटीसाठी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.१७ वाजता सुटेल. ११.३६ वाजता पोहोचेल.- ब्लॉकनंतर सीएसएमटीसाठी पहिली लोकल पनवेल येथून ४.१० वाजता सुटेल. ५.३० वाजता पोहोचेल. डाउन ट्रान्स-हार्बर मार्ग- ब्लॉकपूर्वी पनवेल येथे जाणारी शेवटची लोकल ठाणे येथून सकाळी ९.३९ वाजता सुटेल. पनवेल येथे सकाळी १०.३१ वाजता पोहोचेल.- ब्लॉकनंतर पनवेल येथे जाणारी पहिली लोकल ठाणे येथून दुपारी ४ वाजता सुटेल. पनवेल येथे दुपारी ४.५२ वाजता पोहोचेल. अप ट्रान्स-हार्बर मार्ग- ब्लॉकपूर्वी ठाणे येथे जाणारी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.४१ वाजता सुटेल. ठाणे येथे ११.३३ वाजता पोहोचेल.- ब्लॉकनंतर ठाणे येथे जाणारी पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी ४.२६ वाजता सुटेल. ठाणे येथे सायंकाळी ५.२० वाजता पोहोचेल.सीएसएमटी-वाशी भागावर विशेष लोकल असतील.ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल. 

टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वेमध्य रेल्वे