Join us  

उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! जाणून घ्या कुठपासून कुठपर्यंत अन् किती वाजता?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 11:22 AM

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे

10 March Mega  Block :  रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, १० मार्च रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. 

मध्य रेल्वे - विद्याविहार ते ठाणे पाचव्या आणि सहाव्या ट्रॅकवर सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत

परिणाम - विद्याविहार ते ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईनवर सकाळी ८  ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत आहे. या ब्लॉक कालावधी दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून सुटणाऱ्या/येणाऱ्या डाऊन आणि अप मेल/एक्सप्रेस गाड्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान अनुक्रमे डाऊन आणि अप जलद मार्गांवर वळवण्यात येणार आहेत. तसेच नियमित लोकल वेळेपेक्षा १०  ते १५  मिनिटे उशिराने चालवल्या जातील.

हार्बर रेल्वे - मानखूर्द ते नेरुळ अप आणि डाऊन लाइनवर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत

परिणाम -  मानखुर्द आणि नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४. १५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ ते दुपारी ३.२८ पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.३७  ते दुपारी ३.४५ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. 

पश्चिम रेल्वे - बोरीवली ते भाईंदर शनिवारी रात्री ११.३० ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत. रविवारी दिवसा ब्लॅाक नाही.

परिणाम :पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नाही. परंतु शनिवार/रविवारच्या मध्यरात्री म्हणजेच ९ - १० मार्चला रात्री बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान ४ तासांसाठी ब्लॉक असेल.

टॅग्स :मुंबईपश्चिम रेल्वेमध्य रेल्वेहार्बर रेल्वे