Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वे मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2016 09:14 IST

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर रविवारी रुळांच्या दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येतो.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ४ - मध्य रेल्वे मार्गावरील आजचा रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर रविवारी रुळांच्या दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येतो. 
 
मध्य रेल्वेने हा निर्णय घेऊन मुंबईकर प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. उद्यापासून गणेशोत्सव सुरु होत असून, अनेक घरांमध्ये अजूनही खरेदीची लगबग संपलेली नाही. आज रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेकजण  खरेदीसाठी घराबाहेर पडणार आहेत. 
 
त्यांना त्रास होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला. गणेशोत्सवासाठी अनेक बाजारपेठा सजल्या असून, दादर,लालबाग या प्रमुख बाजारांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.