मुंबई / पालघर : रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार, १७ डिसेंबर रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. हार्बर मार्गावर पनवेल ते नेरूळ अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे, तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते नायगाव अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत ब्लॉक घेण्यात येईल.मध्य रेल्वेवर सकाळी १०.५४ ते दुपारी ४.१९ दरम्यान कल्याण ते ठाण्यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाºया जलद गाड्या धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. ठाण्यानंतर पुन्हा जलद मार्गावर वळविण्यात येतील. सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ दरम्यान छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून डाउन जलद मार्गावर सुटणाºया सर्व गाड्या घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील.हार्बर मार्गावर सकाळी ११.०४ ते दुपारी ४.३० दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून वाशी, बेलापूर आणि पनवेलच्या दिशेने जाणाºया लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, तसेच सकाळी १०.३० ते दुपारी ४.२८ दरम्यान वाशी, बेलापूर, पनवेलवरून सीएसएमटीला जाणाºया सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशी/नेरूळ विशेष लोकल सेवा चालविण्यात येईल. ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-पनवेल वाहतूक सकाळी ११.०२ ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत बंद राहील.पॅसेंजर गाड्यांनाही फटका५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी दिवा स्थानकापर्यंतच चालविण्यातयेईल आणि ५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी दिवा स्थानकातून सुटेल. ५०१०३ गाडीच्या प्रवाशांसाठी दादर ते दिवा विशेष उपनगरीय गाडी चालविण्यात येईल. ही विशेष गाडी दादरहून ३.४० वाजता सुटेल. दिवा स्थानकावर ४.१३ वाजता पोहोचेल. ब्लॉक काळात मुंबईला येणाºया मेल आणि एक्स्प्रेस गाड्या निर्धारित वेळेपेक्षा २० ते ३० मिनिटे उशिरा पोहोचतील.
आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक; पॅसेंजर गाड्यांनाही फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 06:15 IST