भिवंडी : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या बुधवारच्या येथील सभेकडे कार्यकत्र्यानी पाठ फिरविली़ भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघांसाठी ही सभा झाली.
गोकूळ नगरमधील चॅलेंज ग्राउंडवर मंगळवारी दुपारी 12 वाजता सभा होती. मात्र सभेला कार्यकत्र्याची गर्दी न झाल्याने गडकरी दुपारी 3 वाजता मंचावर आले. त्यानंतरही मैदानावरील अध्र्यापेक्षा अधिक खुच्र्या रिकाम्या होत्या. खा. कपिल पाटील यांच्यासह भिवंडीतील तीन विधानसभा मतदारसंघांतील उमेदवार महेश चौघुले, संतोष शेट्टी व शांताराम पाटील यांच्यासह भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष श्याम अग्रवाल या वेळी उपस्थित होते.