Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजावाडीत रुग्णांना औषधाची रिअॅक्शन

By admin | Updated: August 23, 2014 01:36 IST

घाटकोपर येथील 10 रुग्णांना शुक्रवारी रात्री 11 नंतर औषधाची रिअॅक्शन म्हणून थंडी भरली होती.

मुंबई :  घाटकोपर येथील 10 रुग्णांना शुक्रवारी रात्री 11 नंतर औषधाची रिअॅक्शन म्हणून थंडी भरली होती. मात्र काही तासांतच सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर झाल्याची माहिती उपनगरीय रुग्णालये प्रमुख डॉ. एम. वाडीवाला यांनी दिली. 
राजावाडी रुग्णालयातील रुग्णांना रात्री औषधे दिाली. यानंतर या रुग्णालयातील 1क् रुग्णांना  थंडी वाजू लागली. एकाच वेळी 1क् जणांना थंडी वाजायला लागल्यामुळे औषधाची रिअॅक्शन असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. तत्काळ त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. यामुळे या सर्व जणांची प्रकृती स्थिर झाली. आता कोणत्याही रुग्णाला त्रस होत नसल्याचे डॉ. वाडीवाला यांनी सांगितले. मात्र या संदर्भात इतर कोणतीही माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली नाही.   (प्रतिनिधी)