ठाणे : पालिकेने सहा महिन्यापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांची आॅफलाईन भरती प्रक्रिया केली होती. परंतु कॉंग्रेसच्या नगरसेवकाने या संदर्भात, राज्य शासनाकडे तक्रार केल्यानंतर अखेर ही प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश शासनाने पालिकेला दिले आहेत.ठाणे महापालिकेच्या वतीने आरोग्य विभागात सुमारे १०० वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया हाती घेतली होती. सहा महिन्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण झाली होती. परंतु ही प्रक्रिया आॅफलाईन पध्दतीने घेतल्याने कॉंग्रेसचे नगरसेवक व गटनेते विक्रांत चव्हाण यांनी आक्षेप घेत ही प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने घ्यावी असे सांगितले होते. परंतु पालिकेने याकडे दुर्लक्ष करुन, ही प्रक्रिया आॅफलाईन पध्दतीनेच पूर्ण केल्याने अखेर या संदर्भात चव्हाण यांनी राज्य शासनाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आता राज्य शासनाने नुकतीच ही प्रक्रिया रद्द करुन पुन्हा नव्याने प्रक्रिया घ्यावी असे आदेश पालिकेला दिले आहेत. तसेच या संदर्भातील जाहीरात देखील नव्याने काढण्यात यावी असेही सूचित करण्यात आले आहे.
वैद्यकीय अधिकारी आॅफलाईन भरतीला ब्रेक
By admin | Updated: December 19, 2014 23:13 IST