Join us
Daily Top 2Weekly Top 5

पदकांची लयलूट

By admin | Updated: September 27, 2014 23:02 IST

जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत ठाण्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या ज्युदोपटूंनी 11 सुवर्ण, 7 रौप्य आणि 12 कांस्यपदकांसह 3क् पदकांची लयलूट केली आहे.

ठाणो : जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत ठाण्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या ज्युदोपटूंनी 11 सुवर्ण, 7 रौप्य आणि 12 कांस्यपदकांसह 3क् पदकांची लयलूट केली आहे. तसेच या स्पर्धेत कौस्तुभ शिर्के आणि साहिल मेंडन यांना सर्वाेत्कृष्ट ज्युदोपटू म्हणून गौरविण्यात आले आहे.
डोंबिवलीत नुकतेच ठाणो जिल्हा ज्युदो असोसिएशन आणि रोट्रॅक्ट झोन 3 बी यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुंबई आणि ठाणो जिल्ह्यातून 4क्क् स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा 8, 1क्, 12, 14, 17 या पाच वयोगटांत संपन्न झाली. ज्युदोपटू स्वराज वावडेकर, ओंकार लांबाडे, प्रणित लांबाडे, निहार गायकर, कौस्तुभ शिर्के , अपूर्वा पाटील, ध्रुव बुटोला, सोहम हिर्लेकर, वरुण शिंदे, संस्कृती इंगुळकर, साहिल मेंडन यांनी सुवर्णपदक तर रोहन शेलार, ओम पणशीकर, श्रेयस ठाकूर, तरुण मौर्या, वरद वालावलकर, जान्हवी पवार, प्रेरणा रिसबूड यांनी रौप्यपदक तसेच शताक्षी तावरे, सात्यकी मुळे, ईशान ताटके, सिद्धेश घोलप, स्वराज वेलणकर, राज रोकडे, हितेन बुटोला, आर्यन जैन, लव वाघ, सोहम खापरे, प्रिशा पाटील, श्रीहर्ष शेटय़े यांनी कांस्यपदके पटकावली आहेत. हे स्पर्धक प्रशिक्षक देवीसिंग राजपूत व सहप्रशिक्षक भूपेंद्रसिंग राजपूत व दीपश्री सुव्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युदोचे धडे घेत आहेत. (प्रतिनिधी)