Join us  

Me Too : ‘मीटू’ मोहीमेतील व्यक्त होणा-या मुलींना पाठिंबा द्या - गिरीश संघवी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 9:44 AM

Me Too : पीडितेला व्यक्त होण्यासाठी मानसिकता निर्माण व्हावी लागते, त्यामुळे या व्यक्त होणा-या महिला, तरुणींना समाजाने पाठिंबा देणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉ. गिरीश संघवी यांनी मांडले आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु झालेल्या ‘मीटू’ मोहिमेत विविध वयोगटातील महिला व तरुण मुली त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अत्याचाराला वाचा फोडत आहेत. अशा वेळी समाजात असाही एक गट आहे, इतक्या दीर्घ काळानंतर व्यक्त होतात असा प्रश्न विचारत आहे. मात्र अशा प्रकरणांमध्ये पीडितेला व्यक्त होण्यासाठी मानसिकता निर्माण व्हावी लागते, त्यामुळे या व्यक्त होणा-या महिला, तरुणींना समाजाने पाठिंबा देणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉ. गिरीश संघवी यांनी मांडले आहे. लहानग्या मुला-मुलींमध्ये वाढणा-या अत्याचारामागील कारणे समजून घेतली पाहिजे. लहानग्यांची जडण-घडण होताना त्यांना मिळणारे वातावरण, संगत, लैंगिक शिक्षणाचा अभाव ही मुख्य कारणे लक्षात घेतली पाहिजे.

(#MeToo : मी टू प्रकरणी सिंम्बायोसिसचे दोन प्राध्यापक निलंबित)

सध्या समाजात विभक्त कुटुंबपद्धती रुजली आहे, त्यामुळे अनेकदा कुटुंबातील आई-वडील कामाला जाऊन त्यांची अपत्ये घरात एकटी असतात. अशा  परिस्थितीत त्या लहानग्यांची जडण-घडण पोषक वातावरण होत नाही, परिणामी अत्याचारांच्या घटना वाढत जातात. आता ‘मीटू’ मोहीमेचा वाढता विस्तार पाहता   आता या महिलांना सोशल मीडियामुळे व्यासपीठ मिळाले आहे. परंतु, या विषयी केवळ व्यक्त होणे आणि अन्यायाची दाद मागणे यात फरक असून याची सखोल तपासणी होऊन त्याची सत्यता पडताळली पाहिजे. या मोहीमेद्वारे समाजाने धडा घेऊन अशा पीडितांसाठी मानसिक आधार निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरुन, ही मोहीम अधिक सशक्तपणे वाढत जाणे गरजेचे आहे.

टॅग्स :मीटूलैंगिक छळ