Join us
Daily Top 2Weekly Top 5

एमसीए, बीएससीआयटीचे निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 02:03 IST

उन्हाळी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी आॅनलाइनचा केलेला वापर विद्यापीठाच्या अंगाशी आला. तरीही, हिवाळी सत्राच्या परीक्षांसाठी विद्यापीठाने आॅनलाइन पद्धतीने निकाल लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या परीक्षांचेही निकाल उशिराने लागतील अशी भीती विद्यार्थ्यांना होती. मात्र तीन दिवसांत विद्यापीठाने पाच निकाल जाहीर केले.

मुंबई : उन्हाळी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी आॅनलाइनचा केलेला वापर विद्यापीठाच्या अंगाशी आला. तरीही, हिवाळी सत्राच्या परीक्षांसाठी विद्यापीठाने आॅनलाइन पद्धतीने निकाल लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या परीक्षांचेही निकाल उशिराने लागतील अशी भीती विद्यार्थ्यांना होती. मात्र तीन दिवसांत विद्यापीठाने पाच निकाल जाहीर केले.शुक्रवारी रात्री विद्यापीठाने मास्टर इन कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (एमसीए) अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राचे आणि बीएससी आयटीच्या पाचव्या सत्राचे निकाल जाहीर केले आहेत.हिवाळी सत्रात विद्यापीठाच्या एकूण ४०२ परीक्षा झाल्या होत्या. त्यापैकी आतापर्यंत विद्यापीठाने १९८ निकाल जाहीर केले आहेत. पण, अजूनही तब्बल २०४ परीक्षांचे निकाल जाहीर केलेले नाहीत. उर्वरित निकालांमध्ये वाणिज्य आणि विधि शाखांच्या निकालांचाही समावेश आहे. उन्हाळी परीक्षांच्या निकालांमध्ये वाणिज्य आणि विधि अभ्यासक्रमाचे निकाल लावण्यास सर्वाधिक उशीर झाला होता.शुक्रवारी रात्रीपर्यंत एमसीएच्या ९९३ आणि बीएससी आयटीच्या१२ हजार ३२५ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले. तर बीएससीच्या पाचव्या सत्राचे ३८५ निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेला १८,५३५ विद्यार्थी बसले होते.

टॅग्स :मुंबई