Join us

महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:15 IST

आरोपीला गुजरातमधून अटक : आझाद मैदान पोलिसांकडून तपास सुरूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना ...

आरोपीला गुजरातमधून अटक : आझाद मैदान पोलिसांकडून तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका आरोपीला बुधवारी गुजरातच्या जामनगरमधून अटक करण्यात आली. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मुंबईत सध्या पालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता महापालिका कार्यालयात असताना पेडणेकर यांना अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. कॉलवर बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत थेट जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देणारी व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. त्यानंतर दोन दिवसांनी पेडणेकर यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपासात धमकी देणारा व्यक्ती गुजरातच्या जामनगरची रहिवासी असल्याचे स्पष्ट होताच तपास पथक गुजरातला रवाना झाले. बुधवारी त्या तरुणाला अटक करून हे पथक मुंबईकडे येण्यास निघाले आहे.