Join us  

१६ मे रोजी राज्यात असतील ७.११ लाख सक्रिय रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 5:27 AM

रुग्णसंख्या वाढण्याच्या प्रमाणावर नियंत्रण येण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १६ मे पर्यंत काहीशी कमी होईल आणि रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण नियंत्रणात आलेले असेल, असा अंदाज सार्वजनिक आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. रुग्ण सुविधाही वाढलेल्या असतील. सर्वंकष प्रयत्नांद्वारे हा आकडा आणखी कमी करण्याचा निर्धार विभागाने केला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागाने कोरोनासंदर्भातील सद्यस्थितीचे सादरीकरण केले. त्यात दिलेल्या आकडेवारीनुसार, ११ मे रोजी राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ७ लाख ११,७९५ इतकी असेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ११ मे रोजी कोणत्या जिल्ह्यात किती सुविधा असतील याचीही आकडेवारी दिली असून मुंबई, ठाण्याला पुरेशा सुविधा दिसतात. तेथे आयसोलेशन खाटा, ऑक्सिजन खाटा, आयसीयू खाटा, व्हेंटिलेटर याबाबत कोणताही तुटवडा नाही आणि ११ मे रोजी देखील नसेल. २८ एप्रिल रोजीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ११ मे  रोजी रुग्णसंख्या आणि सुविधांबाबतचा अंदाज देण्यात आला होता. तो अंदाज आणि १६ मेपर्यंतच्या अंदाजाची आकडेवारी बघता राज्यातील रुग्णसंख्या कमी होईल असे दिसते. 

१६ मे रोजीचा वर्तविलेला अंदाज (सक्रिय रुग्ण आणि खाटा- प्रमुख दहा जिल्हे)जिल्हा    १६ मे रोजी     आयसोलेशन     ऑक्सिजन     आयसीयू     व्हेंटिलेटर्स    अंदाजे रुग्ण    खाटा    खाटा    खाटामुंबई    २९६३८    ४४००८    १०३८०    २१२१    १२७३ठाणे    २१७०६    १६१९४    ८७४८    २५४२    ८१९पालघर    २३४८१    ४६१८    २८५    २१२    ५८पुणे    १३१६९६    ३०१४५    ४९५२    १९१    १२७सातारा    ३१९४४    १०८६७    १२७१    ३०९    ९४नागपूर    ४०९१९    ६८७१    १३५३    १४९६    ३५९चंद्रपूर    २६१२४    ९२४८    २२६०    ५२३    १०६नाशिक    ७८६८६    २९६७९    ३८८२    ८५२    २०२अहमदनगर    ३६९५२    २८२७    १०८१    २५७    ३२सोलापूर    ३३४८५    २१९१    १६८४    १०६    ३३

राज्यातील नवीन रुग्णदर आणि मृत्यूसंख्यामहिना    रुग्णसंख्या    दैनंदिन नवीन     मृत्यू    मृत्यूदर    रुग्ण (सरासरी)नोव्हेंबर २०२०    १४३२६२    ४७७५    ३२४०    २.२६डिसेंबर २०२०    १२०६८४    ३८९३    २३७०    १.९६जानेवारी २०२१    ९२१७७    २९७३    १५६१    १.६९फेब्रुवारी २०२१    १३१३१६    ४६९०    १०७२    ०.८२मार्च २०२१    ६५७९१०    २१२२२    २४९५    ०.३८एप्रिल २०२१    १७८९४०६    ५९६४७    १३८३५    ०.७७१ ते ४ मे २०२१    २२०४३०    ५५१०८    २९२९    १.३२

(तक्त्यामध्ये दिलेली उणे संख्या ही खाटा, व्हेंटिलेटर्सची कमतरता दर्शविते तर त्या शिवायचे आकडे हे अतिरिक्त असलेली संख्या दर्शवितात. ही आकडेवारी टॉप टेन जिल्ह्यांची आहे. )

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या