Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुर्ल्यात नऊ रिक्षांची अज्ञाताकडून मोडतोड, लाखोंचे नुकसान, कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 05:27 IST

कुर्ल्यातील शेल कॉलनी परिसरात पार्क केलेल्या ८ ते ९ रिक्षांची शनिवारी मध्यरात्री तोडफोड करण्यात आली आहे.

मुंबई : कुर्ल्यातील शेल कॉलनी परिसरात पार्क केलेल्या ८ ते ९ रिक्षांची शनिवारी मध्यरात्री तोडफोड करण्यात आली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अज्ञात इसमाने केलेल्या या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना, विकृताने केलेल्या या घटनेमुळे परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एखाद्या माथेफिरू किंवा विकृताकडून हे कृत्य केले गेले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.कुर्ल्यातील शेल कॉलनी परिसरात नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेला रिक्षा पार्क केलेल्या होत्या. अज्ञातांनी त्याची ग्लास, हँड, कव्हर तोडून टाकली. अवघ्या काही मिनिटांत हे कृत्य करीत ते पसार झाले. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. परिसरात काचांचा खच पडला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तोडफोडीमागील कारणाचा शोध घेतला जात असल्याचे कुर्ला पोलिसांनी सांगितले.