Join us  

मटका किंग रतन खत्री यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 2:26 PM

मटका किंग रतन खत्री यांचं निधन झालं आहे. मुंबईत शनिवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

मुंबई : मटका किंग रतन खत्री यांचं निधन झालं आहे. मुंबईत शनिवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते 88 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. शनिवारी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. रतन खत्री मुंबई सेंट्रलमधील नवजीवन सोसायटीत आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. शनिवारी सकाळी खत्री यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सट्टा आणि मटका क्षेत्रातल्या लोकांना दु:ख अनावर झालं आहे. 1960च्या काळात त्यांनी कल्याण भगत यांच्यासोबत मुंबईत मटक्याचा धंदा सुरू केला होता. खत्री भगत यांच्या धंद्यात मॅनेजर म्हणून रुजू झाले होते. 1964मध्ये खत्री यांनी भगतपासून वेगळे होऊन स्वत: चा रतन मटका धंदा सुरू केला.पाहता पाहता त्यांचा धंदा एवढा लोकप्रिय झाला की, त्यांना मटका किंगच लोक म्हणू लागले. गेल्या अनेक दशकांपासून आजमितीस मटका हे अनेकांच्या आवडीचं व्यसन आहे. खत्री यांच्या जाण्याने सट्टा किंवा मटका क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मटका किंवा एका भांड्यात चिट्सवरून चिठ्ठी काढण्यामुळे ते प्रसिद्ध झाले. त्या काळात जुगाराची उलाढाल दररोज 1 कोटी रुपयांच्या घरात होती.सट्टा, मटका किंवा लॉटरी हा आकड्यांचा खेळ म्हणून लोकप्रिय आहे. हा खेळ इंग्रजांच्या काळापासून मुंबईत खेळला जातो. त्यावेळी न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजमधून कापसाचे दरवाजे उघडणे व बंद करणे यावर पैसे लावले जायचे, असंही सांगितलं जातं. 1960च्या दशकात मटका हा मुंबईत अनेक तरुणांच्या आकर्षणाचा विषय होता. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

नेदरलँडमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन; ग्लास केबिनमध्ये करता येणार डिनर

CoronaVirus News : हा तर अपयश लपवण्याचा प्रयत्न; काँग्रेस प्रवक्त्यांचा अप्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांवर निशाणा

CoronaVirus : भारताच्या 'गेमचेंजर' औषधानं केलं निराश; जगभरात होता आशेचा किरण

पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा भारताचा प्लॅन तयार; पाकिस्तान दहशतीखाली

CoronaVirus: कोरोनावर लस तयार करण्याच्या भारत फक्त एक पाऊल दूर; प्राण्यांवर होणार ट्रायल

CoronaVirus News : धक्कादायक! जळगावात आणखी ११ कोरोनाबाधित रुग्ण सापडले