Join us

माथेरान ट्रेक अभियंत्याला पडला महागात

By admin | Updated: October 6, 2015 05:29 IST

येथील एका तरुण अभियंत्याला एकट्याने माथेरान ट्रेक करणे महागात पडले. माथेरानचा डोंगर चढला आणि सनसेट पॉइंटमार्गे घरी परतताना तो जंगलातच हरवला. कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव

- वैभव गायकर,  पनवेलयेथील एका तरुण अभियंत्याला एकट्याने माथेरान ट्रेक करणे महागात पडले. माथेरानचा डोंगर चढला आणि सनसेट पॉइंटमार्गे घरी परतताना तो जंगलातच हरवला. कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर पोलीस आणि स्थानिकांनी मिळून किर्र अंधारातून त्याला शोधून काढले. समरेश मंडल (२७) असे या अभियंत्याचे नाव असून, तो एका खासगी कंपनीत काम करतो. रविवारी सकाळी नवीन पनवेल या ठिकाणाहून हा तरुण बसने धोदाणीला पोहोचला. तेथून त्याने टे्रकिंगला सुरुवात केली. दुपारी २.३०च्या सुमारास माथेरानला सुखरूप पोहोचल्यानंतर त्याने ३ वाजता सनसेट पॉइंट येथून परतीचा प्रवास सुरू केला. मात्र अर्ध्यावर आल्यानंतर तो रस्ता चुकला. सायंकाळ झाली तरी रस्ता सापडत नसल्याने त्याने आईला फोन करून रस्ता चुकल्याचे सांगितले. सव्वापाच वाजता त्याने एसएमएस करून पुन्हा एकदा कुटुंबीयांना हरविल्याची माहिती दिली. कुटुंबीयांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक आनंद सावंत यांच्या टीमने सायंकाळी ७ वाजता ट्रेकर्स आणि स्थानिक आदिवासींच्या मदतीने बॅटरीच्या उजेडात समरेशचा शोध सुरू केला. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री ९ वाजता त्यांना समरेश एका ठिकाणी प्रकृती बिघडलेल्या अवस्थेत सापडला. जीव धोक्यात घालू नयेचॅनेल्सवरील मालिका आणि जाहिरातींमधील स्टंटचे अनुकरण करण्याच्या नादात तरुण अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालतात. असे करण्याआधी तरुणांनी थोडा विचार करावा, असे आवाहन तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्रनाथ देशमुख यांनी केले.