Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोरीवली रेल्वे स्थानकात प्रसूती

By admin | Updated: September 20, 2014 01:32 IST

बोरीवली रेल्वे स्थानकात आज दुपारी प्रवासी महिलेने कन्येला जन्म दिला. सुषमा नवराज गुरू (23) असे या महिलेचे नाव असून, ती नालासोपारा येथील रहिवासी आहे.

मुंबई : बोरीवली रेल्वे स्थानकात आज दुपारी  प्रवासी महिलेने कन्येला जन्म दिला. सुषमा नवराज गुरू (23) असे या महिलेचे नाव असून, ती नालासोपारा येथील रहिवासी आहे. नालासोपारा येथून ती सांताक्रूझ येथे जाण्याकरिता चर्चगेट  लोकलने प्रवास करत होती. लोकल दुपारी 12 वाजता बोरीवली रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर आली असता तिलाप्रसूती वेदना जाणवू लागल्या. ही माहिती बोरीवली रेल्वे महिला पोलिसांना मिळताच त्यांनी रेल्वे स्थानकातच सुषमाची प्रसूती केली. त्या दोघांना बोरीवलीच्या भगवती रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)