Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता अक्षय कुमारला मातृशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:06 IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आई अरुणा भाटिया यांचे निधन झाले आहे. अक्षय कुमारने स्वत: एक ट्विट करत ...

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आई अरुणा भाटिया यांचे निधन झाले आहे. अक्षय कुमारने स्वत: एक ट्विट करत बुधवारी ही दुःखद बातमी दिली आहे. गेल्या दोन दिवसापासून प्रकृती बिघडल्याने अरुणा भाटिया यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर बुधवारी सकाळी अरुणा भाटिया यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारच्या आईच्या निधनानंतर बॉलिवूडमधूनही दु:ख व्यक्त केले जात आहे.

अक्षय कुमारने आईच्या निधनानंतर भावूकमध्ये म्हटले आहे,“ती माझं सर्वस्व होती आणि आज मला तिच्या जाण्याने अंतःकरणात असह्य वेदना होत आहेत. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे आणि ती माझ्या वडिलांकडे दुसऱ्या जगात गेली आहे. या कठीण काळात माझ्या कुटुंबासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांना आदर करतो. ओम शांती”, अशा आशयाचा संदेश लिहिला आहे. अक्षय कुमारच्या आई अरुणा भाटिया यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. ही बातमी मिळताच अक्षय कुमार त्वरित लंडनहून मुंबईत परतला होता.