पनवेल : पनवेल तालुका पत्रकार मंच आणि ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने पनवेल बसस्थानकावर स्वाइन फ्लू आजाराबाबत जनजागृती केली. प्रवासी आणि एसटीचे वाहक, चालकांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. प्रवाशांना या आजाराबाबत ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक बी. एस. लोहारे यांनी माहिती दिली. यावेळी वरिष्ठ आगार व्यवस्थापक आर. जी. परदेशी, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, गणेश कोळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्रवाशांना मास्कचे वाटप
By admin | Updated: March 2, 2015 03:01 IST