मुंबई : पती नांदवत नाही म्हणून तणावात असलेल्या २९ वर्षीय विवाहितेने मांडीवर सुसाईट नोट लिहून सार्वजनिक शौचालयात गळफास घेतल्याची घटना मुलुंडमध्ये घडली. याप्रकरणी गुरुवारी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलुंड पश्चिमेकडील पंचशीलनगर परिसरात २९ वर्षीय तरुणी आईकड़े राहण्यास होती. गेल्या दोन वर्षांपासून पती नांदवत नसल्याने ती तणावात होती. तिला एक मुलगा आहे. २८ जानेवारी रोजी नैसर्गिक विधीसाठी जाते सांगून विवाहिता घराबाहेर पडली. येथील सार्वजनिक शौचालयातील नळाला गळफास घेत तिने आयुष्य संपविले. अर्धा तास उलटूनही ती घरी आली नाही म्हणून आईने शौचालयाकडे धाव घेतली. तिथे ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनेची वर्दी मिळताच मुलुंड पोलीस तेथे दाखल झाले. पोलिसांनी तिच्या मृत्यूच्या कारणाचा शोध सुरू केला. अखेर, तिच्या मांडीवर लाल पेनाने लिहिलेली सुसाइट पोलिसांच्या नजरेत पडली. "पतीने दिलेल्या मानसिक त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे" त्यात लिहिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
.....