Join us
Daily Top 2Weekly Top 5

हुंडय़ासाठी विवाहितेची हत्या; तिघांना अटक

By admin | Updated: June 20, 2014 01:50 IST

माहेरहून हुंडा आणला नाही म्हणून एका 27वर्षीय विवाहितेची सासरच्यांनी जाळून हत्या केल्याची घटना धारावीत घडली.

मुंबई : माहेरहून हुंडा आणला नाही म्हणून एका 27वर्षीय विवाहितेची सासरच्यांनी जाळून हत्या केल्याची घटना धारावीत घडली. या प्रकरणी धारावी पोलिसांनी पतीसह चार जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.
मीना शेख असे या मृत 
महिलेचे नाव असून, ती धारावीच्या 9क् फूट रोड परिसरातील साईबाबानगरात पती, सासू आणि दोन नणंदांसह राहत होती. 9 वर्षापूर्वी तिचा विवाह इरफानसोबत झाला. मात्र लग्न झाल्यापासून पती, सासू आणि दोन नणंदा हुंडय़ासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करीत होते. 14 जूनच्या रात्री तिच्या सासरच्या मंडळींसोबत तिचा वाद झाला होता. याच दरम्यान या आरोपींनी मीनाच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटले.
मात्र घटनेनंतर मीनाने आत्महत्या केल्याचा कांगावा सासरच्यांनी केला. त्यामुळे काही रहिवाशांनी त्यांच्या घराकडे धाव घेत मीनाला सायन रुग्णालयात दाखल केले. 85 टक्के भाजलेल्या मीनाची दोन दिवस मृत्यूशी झुंज सुरू होती. याचदरम्यान पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला होता. मंगळवारी उपचार सुरू असतानाच तिचा सकाळी सातच्या सुमारास मृत्यू झाला. धारावी पोलिसांनी याबाबत तिच्या पतीसह चार जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करीत सासू हमिदा शेख (55), नणंद नफिसा शेख (35) आणि टिम्मी शेख (22) या तिघींना अटक केली. (प्रतिनिधी)