Join us

वडाळय़ामध्ये विवाहितेवर बलात्कार

By admin | Updated: September 21, 2014 02:34 IST

34वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना शुक्रवारी वडाळ्यात घडली. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी अब्दुल खान (2क्) या आरोपीला अटक केली आहे.

 

मुंबई : 34वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना शुक्रवारी वडाळ्यात घडली. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी अब्दुल खान (2क्) या आरोपीला अटक केली आहे.
वर्षभरापूर्वी वडाळ्यातील संगमनगर येथे ही महिला पती आणि 3 वर्षाच्या मुलीसह राहत होती. तेव्हापासून हा आरोपी महिलेची छेड काढत होता.  तिच्या पतीला ही बाब समजताच त्याने संगमनगरातील भाडय़ाची खोली सोडून कोकरी आगार परिसरात घर घेतले. शुक्रवारी महिलेचा पती घरात नव्हता. हीच संधी साधत त्याने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. याच दरम्यान महिलेचा पती घरी परतला. त्याने याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)