Join us
Daily Top 2Weekly Top 5

खालापूर तालुक्यातील चौक येथे विवाहितेवर बलात्कार

By admin | Updated: May 4, 2015 23:46 IST

खालापूर तालुक्यात चौकमधील राजकीय पक्षाच्या एका कार्यकर्त्याने आपल्याच मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे

खालापूर : खालापूर तालुक्यात चौकमधील राजकीय पक्षाच्या एका कार्यकर्त्याने आपल्याच मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. आरोपी फरार असून पीडित महिलेला वारंवार धमकी देत असल्याने महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. तालुक्याच्या चौक येथे एका राजकीय पक्षाचे काम करणाऱ्या प्रकाश विठ्ठल पवार याच्याकडे पीडित महिलेचा पती कामाला होता. आपला मित्र घराच्या बाहेर कामानिमित्ताने असल्याने त्याचा फायदा उचलून २६ सप्टेंबर २०१४ या दिवशी दुपारच्या सुमारास पवार याने मित्राचे घर गाठले. सुरुवातीला सहजच आलो असल्याचे कारण देत पाणी मागितले. या वेळी घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेवून महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध करताच पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देवून त्याने बलात्कार केला. आरोपी पवार याने या प्रकारानंतर कायम शरीर सुखाची मागणी केली. पीडित महिलेला मोबाइलवरून अश्लील मेसेज पाठवून मानसिक त्रास देणे सुरूच ठेवले. हतबल झालेल्या या महिलेने झाला प्रकार पतीला सांगून आरोपीविरोधात रविवारी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुरेश अतिग्रे यांनी दिली. (वार्ताहर)