Join us
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेवर बलात्कार

By admin | Updated: June 1, 2015 22:24 IST

माथेरानमध्ये रानमेवा विकण्यासाठी आलेल्या विवाहितेवर नवरोजी गार्डनजवळील जंगलात बलात्कार झाल्याची घटना येथे घडली.

माथेरान : माथेरानमध्ये रानमेवा विकण्यासाठी आलेल्या विवाहितेवर नवरोजी गार्डनजवळील जंगलात बलात्कार झाल्याची घटना येथे घडली. माथेरानमध्ये सध्या पर्यटन हंगाम जोरात असल्याने आदिवासी महिला याठिकाणी रानमेवा विकण्यासाठी येतात. रविवारी माथेरानचा आठवडा बाजार भरत असल्याने मोठी गर्दी असते. ताडवाडी येथील विवाहित महिला याठिकाणी फळे विकण्यासाठी आली असता यशवंत भिकू केवारे (२८, रा. तीनघर खालापूर) याने तिला जबरदस्ती जंगलात नेउन बलात्कार केला. याप्रकरणी महिलेने माथेरान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी यशवंत केवारेला अटक करण्यात आली. मंगळवार, २ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.