Join us

इलेक्ट्रिशियनकडून विवाहितेचा विनयभंग

By admin | Updated: February 27, 2016 02:56 IST

इलेक्ट्रिसिटीच्या केलेल्या कामाचे बिल घेण्याच्या बहाण्याने घरी आलेल्या इलेक्ट्रिशियनने ३३वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी गावदेवी परिसरात घडली

मुंबई : इलेक्ट्रिसिटीच्या केलेल्या कामाचे बिल घेण्याच्या बहाण्याने घरी आलेल्या इलेक्ट्रिशियनने ३३वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी गावदेवी परिसरात घडली. या प्रकरणी भिरोजकुमार खापर (२५) याला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.गावदेवी परिसरात तक्रारदार तरुणी कुटुंबासह राहते. खापरने तिच्या घरी इलेक्ट्रिक दुरुस्तीचे काम केले होते. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास केलेल्या कामाचे पैसे घेण्यासाठी तो घरी आला होता. तेव्हा विवाहिता घरात एकटीच असल्याचा फायदा घेत त्याने तिच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. महिलेने आरडाओरड केली असता, स्थानिकांनी खापरच्या मुसक्या आवळल्या. खापरला बेदम चोप देत त्याला गावदेवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. खापर विलेपार्ले येथे राहतो. या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून खापरला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती गावदेवी पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)