मुंबई : मालावणीतील दोन भावांना नौदलाच्या कर्मचाऱ्यांकडून मारहाण झाल्याची घटना घडली. मारहाणीत जखमी झालेल्यांची नावे गेविन कोरिया (१६) आणि ब्रँडीन कोरिया (२०) अशी असून, शनिवारी घडलेल्या या घटनेनंतर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी रविवारी आंदोलन छेडले जाणार आहे.मदर तेरेसा फाउंडेशनचे प्रमुख जॉन डेनिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरोडीतील बसवीरानगर परिसरात गेविन कोरिया आणि ब्रँडीन कोरिया हे दोघे पालकांसोबत वास्तव्य करतात. ९ एप्रिल रोजी हे दोघे बोटबाईक घेऊन मार्वे समुद्रात गेले होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास काही कारणात्सव त्यांना नेहमीच्या ठिकाणी बोट उभी करता आली नाही. परिणामी त्यांनी दुसऱ्या ठिकाणावरून ही बोट आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हा त्यांना नौदलाने हटकले, शिवाय त्यांच्याशी वाद घातला. मालवणी पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलन छेडले जाईल. (प्रतिनिधी)
नौदल कर्मचाऱ्यांकडून मुलांना मारहाण
By admin | Updated: April 16, 2016 02:06 IST