Join us

मरिन ड्राइव्हवर पोलिसांच्या वाहनाला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:50 IST

उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाने पोलीस वाहनाला धडक दिल्याची घटना सोमवारी रात्री मरिन ड्राइव्ह येथे घडली.यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत.

मुंबई : उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाने पोलीस वाहनाला धडक दिल्याची घटना सोमवारी रात्री मरिन ड्राइव्ह येथे घडली.यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मरिन ड्राइव्ह पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मरिन ड्राइव्ह येथील मफतलाल बाथ सिग्नल येथे (पोलीस बस क्रमांक एम. एच. ०६ एन. ४०९ ) पोलिसांचे वाहन उभे होते. त्याच दरम्यान मागून भरधाव वेगाने आलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाने (एम. एच. ०१ ए.ए. १४७७) त्याला धडक दिली. या वेळी उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनावरील चालक अभिजित देशमुख (२२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यासोबत त्याचा मित्र वाहनात होता.देशमुख हा कंत्राटी कर्मचारी आहे. या अपघातात तो आणि त्याचा मित्र जखमी झाले. यामध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाचा चुराडा झाला. सुदैवाने पोलीस वाहनामध्ये कोणीच नसल्याने मोठी हानी टळली. या प्रकरणी देशमुख याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.