Join us
Daily Top 2Weekly Top 5

मार्डचा आज मास बंक

By admin | Updated: August 23, 2014 01:46 IST

सोलापुरातील निवासी डॉक्टर किरण जाधव यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. डॉ. किरण यांनी सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ डॉक्टर त्रस देतात, असा उल्लेख केला होता.

मुंबई : सोलापुरातील निवासी डॉक्टर किरण जाधव यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. डॉ. किरण यांनी सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ डॉक्टर त्रस देतात, असा उल्लेख केला होता. यामुळे सोलापूरच्या जीएमसी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची बदली करावी, सरकारने जाधव कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत करावी या आणि आणखी काही मागण्यांसाठी शनिवारी राज्यातील 4 हजार निवासी डॉक्टर मास बंक करणार आहेत.
शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून राज्यातील 14 सरकारी रुग्णालये आणि 3 महापालिका रुग्णालयांतील सुमारे 4 हजार निवासी डॉक्टर मास बंक करणार आहेत. मुंबई शहरातील सायन, केईएम आणि नायर या महापालिकेच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टरही या बंकमध्ये सहभागी होणार आहेत. सोलापूर येथील जीएमसी वैद्यकीय महाविद्यालयातील एका निवासी डॉक्टरने आत्महत्या केली आहे. मात्र अजूनही त्या विद्यालयाच्या अधिष्ठात्याची बदली झालेली नाही. त्यांची तत्काळ बदली करावी. याचबरोबरीने राज्य सरकारने जाधव कुटुंबीयांना 5क् लाख रुपयांची मदत केली पाहिजे. या प्रमुख मागण्या निवासी डॉक्टरांनी केल्या आहेत.
निवासी डॉक्टर उद्या मास बंक करणार असल्यामुळे तीनही महापालिका प्रमुख रुग्णालयांतील सामान्य शस्त्रक्रिया रद्द करण्यात आलेल्या आहेत. वरिष्ठ डॉक्टर कामावर असणार आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून मिळाली आहे. (प्रतिनिधी)
 
च्देशातील इतर राज्यांमध्ये निवासी डॉक्टरांसाठी एक योजना आहे. यामध्ये निवासी डॉक्टरांचे मानधन, त्यांच्या कामाचे तास आणि अशा अनेक गोष्टी ठरलेल्या असतात. मात्र महाराष्ट्रात ही योजना राबविली जात नाही. 
च्महाराष्ट्र राज्यानेही ही योजना सुरू करावी, अशीही मागणी सेंट्रल मार्डने केलेली आहे. वरिष्ठांची रिक्त पदे भरली जावीत अशीही मागणी करण्यात आलेली आहे.