मुंबई : मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य व मुंबई रेल्वे विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता. ८) रोजी अमराठी अधिकाऱ्यांसाठी मराठी प्रशिक्षण वर्गाची सुरुवात करण्यात आली. या प्रशिक्षण वर्गात रेल्वेच्या वर्ग-१ च्या एकूण १०० अमराठी अधिकाऱ्यांना मराठीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण वर्गात एकूण १२० तासांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे वर्ग आठवड्यातील दोन दिवस प्रत्येकी दोन तास चालणार आहेत. या प्रशिक्षण वर्गाला रेल्वेतील अमराठी अधिकाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या वर्गासाठी भाषा शिक्षणातील कुशल प्रशिक्षकांची योजना करण्यात आली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाची ही अभिनंदनीय योजना आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मराठी भाषा विभागाचे विनोद तावडे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
अमराठी रेल्वे अधिकाऱ्यांना मराठीचे धडे!
By admin | Updated: September 10, 2015 04:02 IST