Join us

‘झोडिएक’मध्ये मराठी स्टार

By admin | Updated: February 6, 2015 01:01 IST

कॉलेजियन्सच्या आयुष्यात कॉलेज फेस्ट नेहमीच महत्त्वाचे ठरतात. त्यातून कायमच नवे टॅलेंट बाहेर येत असते,

रोहित नाईक ल्ल मुंबईकॉलेजियन्सच्या आयुष्यात कॉलेज फेस्ट नेहमीच महत्त्वाचे ठरतात. त्यातून कायमच नवे टॅलेंट बाहेर येत असते, असे मराठी फिल्मस्टार स्वप्निल जोशी याने वर्सोवा येथील राजीव गांधी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजी (आरजीआयटी) कॉलेजमध्ये आयोजित ‘झोडिएक’ फेस्ट दरम्यान सांगितले. त्याचवेळी आयुष्यात जे काही कराल ते मन लावून करा, असा मोलाचा संदेशदेखील स्वप्निलने या वेळी कॉलेजियन्सला दिला.आरजीआयटी कॉलेजच्या ‘झोडिएक’ फेस्टच्या दुसऱ्या दिवशी अभिनेता स्वप्निल जोशी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे यांनी भेट दिली. या वेळी आपल्या लाडक्या फिल्मस्टार्सना जवळून भेटण्याची संधी मिळालेल्या यंगिस्तानने एकच कल्ला करीत संपूर्ण कॉलेज दणाणून सोडले. शिवाय या तिन्ही स्टार्सनी यंगिस्तानच्या उत्साहात आणखी भर टाकताना गमतीदार खेळ खेळून धम्माल केली. फेस्टच्या दुसऱ्या दिवशीदेखील म्युझिक, पॉप सिंगिंग, ड्रामा तसेच पेंटिंग्सच्या विविध स्पर्धांमध्ये तरुणाईचा सळसळता उत्साह दिसून आला. त्यातच यावेळी मुख्य आकर्षण असलेल्या मराठी स्टार्सचे साडेअकराच्या सुमारास दणक्यात आगमन झाले आणि सगळा कॅम्पस बेधुंद झाला. ‘जय महाराष्ट्र... आपण मराठीमध्येच बोलूया’ असे म्हणत स्वप्निलने सुरुवातीलाच उपस्थितांची मने जिंकली. यानंतर सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे यांनी कॉलेजियन्ससोबत गेम्स खेळत कार्यक्रमाची रंगत वाढवली.दरम्यान, स्वप्नील जोशीने ‘लोकमत’सोबत विशेष चर्चा करताना सांगितले की, कॉलेज फेस्ट हे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असतात. यातूनच प्रत्येकाला आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी हक्काचे रंगमंच मिळत असते. त्यात इंजिनीअरिंगसारख्या विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या ‘स्टे्रस’मधून बाहेर पडण्याची थोडी संधीदेखील मिळते. तसेच कॉलेज फेस्ट हे कॉलेजियन्सच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरत असतात. मला स्पर्धेत सहभागी होण्यापेक्षा हरण्याची भीती होती. मात्र ज्या वेळी मी स्पर्धेत पहिल्यांदा सहभागी झाले त्या वेळी जाणवले की असे काहीच नसते. स्पर्धा ही तात्पुरती असते आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये उत्कृष्ट असाल तर हार-जीतचा विचार सोडून फक्त आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करा, असे टॅलेंट हंट स्पर्धेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने सांगितले.